संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई

वैद्यकिय शिक्षण व संशोधन हे संचालनालय, दि.१ मे, १९७० पासून स्वतंत्ररित्या अस्तित्वात आले. राज्यात असलेली ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये, ४ शासकीय दंत महाविद्यालये आणि १३ शासकीय परिचर्या महाविद्यालये मिळून ५२ संस्थांचे संचालन व नियंत्रण हे संचालनालय करते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणे व त्यांना समाजोपयोगी डॉक्टर बनविणे हे या विभागाचे प्रमुख कर्तव्य आहे.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार आवश्यक सुविधा या वैद्यकीय महाविद्यालयांमधे उपलब्ध करवून देणे व शिक्षणाचे परिमाण राखण्यासोबत रुग्णांना संदर्भ सेवा पुरविणे हे द्वितीय कर्तव्य आहे. रुग्ण, आजार व त्यासंबंधीत संशोधन करणे या विभागाचा अविभाज्य भाग आहे.

अतिदक्षता विभाग

नवजात दक्षता

जळीत विभाग

सि.टी. स्कॅन

मानसोपचार सेवा

रुग्णवाहिका सेवा

सोनोग्राफी सेवा

क्ष किरणशास्त्र

नविन संदेश

नविनसि.ओ.टी (COT) २०२३ सेवा जेष्ठतासूची