प्रस्तावना
वैद्यकिय शिक्षण व संशोधन हे संचालनालय, दि.१ मे, १९७० पासून स्वतंत्ररित्या अस्तित्वात आले. राज्यात असलेली १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये, ३ शासकीय दंत महाविद्यालये मिळून ५२ संस्थांचे संचालन व नियंत्रण हे संचालनालय करते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणे व त्यांना समाजोपयोगी डॉक्टर बनविणे हे या विभागाचे प्रमुख कर्तव्य आहे.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार आवश्यक सुविधा या वैद्यकीय महाविद्यालयांमधे उपलब्ध करवून देणे व शिक्षणाचे परिमाण राखण्यासोबत रुग्णांना संदर्भ सेवा पुरविणे हे द्वितीय कर्तव्य आहे. रुग्ण, आजार व त्यासंबंधीत संशोधन करणे या विभागाचा अविभाज्य भाग आहे.
मिशन
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय हे मुलत: वैद्यकीय/दंत शिक्षण देणे आणि या शैक्षणिक कार्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्नित रुग्णालयांमधुन प्राथमिक व विशेषोपचार आरोग्य सेवा पुरविते. संचालनालयाकडून (१) वैद्यकीय शिक्षण (२) दंत-वैद्यकीय शिक्षण (३) परिचारिका शिक्षण (४) निम-वैद्यकीय शिक्षण इत्यादी दिले जाते.
वैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य हे देशातील एक प्रगत राज्य् असून ॲलोपॅथी, आयुर्वेद, दंत चिकित्सा, होमिओपॅथी व युनानी या विद्याशाखामध्ये शिक्षण दिले जाते या सर्व विद्याशाखेत एकूण 350 महाविद्यालये उपलब्ध असून ही महाविद्यालये शासकीय निम-शासकीय, खाजगी अनुदानित-विनाअनुदानित आणि अभिमत विद्यापिठे या क्षेत्रातील आहे. या महाविद्यालयातून वरील विद्याशाखांमधून सर्व विशेषोपचार आणि अतिविशेषोपचार विषयक शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
- हदयरोग चिकित्सा
- हदय शल्य चिकित्सा
- मूत्ररोग चिकित्सा
- मज्जातंतू चिकित्सा/मज्जातंतूशल्य चिकित्सा
- बालरोग शल्य चिकित्सा
- सुघटनशल्य (प्लॅस्टिक सर्जरी ) चिकित्सा
- जठररोग चिकित्सा (गॅस्ट्रो एन्रॉलॉजी ) तसेच इतर वैद्यकीय, अतिविशेषोपचार सेवा
व्हिजन
- ॲलोपॅथीक व दंत या आधूनिक औषध पदधतीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम शिकवून अर्हताधारक डॉक्टर्स निर्माण करणे.
- ॲलोपॅथीक उपचार पध्दतीनूसार आधूनिक वैद्यक शास्त्रादवारे रुग्णावर उपचार करणे.
- सदरहू आधूनिक उपचार पध्दती नागरीकांमध्ये लोकप्रिय करुन अधिकाधिक रुग्णांना व्याधिमुक्त करण्याचा प्रयत्न करणे.
- ॲलोपॅथीक/दंत पध्दतीमध्ये विविध शासकीय महाविद्यालयांमध्ये संशोधन करुन त्यात प्रमाणे जगातील इतर नवनवीन संशोधनात्म बाबीचा वापर करुन नागरिकांना या संशोधनाचा लाभ मिळवून देणे